लालबागचा राजा हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीला लोकांकडून मिळालेले नाव आहे. मंडळाने गणेशोत्सव 2012 च्या तयारीला जून महिन्यातच सुरुवात केली आहे. भाविकांना लालबागचा राजाचे व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी मंडळ नेहमीच प्रयत्नशिल असते. गणेशोत्सव 2012 साठी सुमारे 2500 सहकारी सभासदांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या बरोबरच सुमारे 5000 स्वयंसेवक लालबागच्या राजाच्या भाविकांच्या मदतीसाठी तयार आहेत. आपाद्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी काही स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
बुधवार दि.19 सप्टेंबर 2012
बुधवार दि.19 सप्टेंबर 2012 रोजी पहाटे 4 वा. मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक मारुती पवार यांच्या शुभहस्ते `श्री` ची प्रतिष्ठापना
सकाळी 6 वाजता लालबागच्या राजाचे दर्शन भाविकांसाठी खुले होईल. व तद्नंतर वार्षिक अहवालाचे प्रकाशन होईल.
दुपारी 12.30 वा. श्री ची आरती मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक मारुती पवार यांच्या हस्ते होईल.
रात्रौ श्री पुढील जागरण व्यवस्था उदयानंद सेवा मंडळ यांची आहे.
गुरुवार दि.20.9.12
गुरुवार दि.20.9.12 सकाळी श्री पुढिल आरती श्री.राजेंद्र मधुकर हळदणकर
रात्रौ श्री पुढिल आरती श्री.राजेंद्र नारायण सावंत
रात्रौ श्री पुढिल जागरण गणेश मित्र मंडळ
शु्क्रवार दि.21.9.12
शु्क्रवार दि.21.9.12 सकाळी श्री पुढिल आरती श्री.सुनिल दत्ताराम जोशी
रात्रौ श्री पुढिल आरती श्री.समीर काशिराम शिगवण
रात्रौ श्री पुढिल जागरण राजा शिवाजी युवा प्रतिष्ठान व बाल शिवाजी क्रिकेट क्लब
शनिवार दि.22 सप्टेंबर 2012
शनिवार दि.22.9.2012 रोजी सकाळी श्री पुढिल आरती श्री.प्रशांत शंकर केळसकर
रात्रौ श्री पुढिल आरती मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री.सतिश अनंत खणकर यांची आहे.
रात्रौ जागरण व्यवस्था हनुमान सेवा मंडळ
रविवार दि.23 सप्टेंबर 2012
रविवार दि.23.9.12 रोजी सकाळी श्री पुढिल आरती श्री.सुगत आत्माराम पडेलकर
रात्रौ श्री पुढिल आरती श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे
रात्रौ जागरण व्यवस्था लालबाग मार्केट व्यापारी असोसिएशन
सोमवार दि.24 सप्टेंबर 2012
सोमवार दि.24.9.12 रोजी सकाळी श्री पुढिल आरती श्री.सुर्यकांत बापू पवार
रात्रौ श्री पुढिल आरती श्री.महेश महादेव पावसकर
रात्रौ जागरण त्रिमुर्ती ओम मित्र मंडळ
मंगळवार दि.25 सप्टेंबर 2012
मंगळवार दि.25.9.2012 सकाळी श्री पुढिल आरती श्री.मंगेश दत्ताराम दळवी
सायंकाळी श्री पुढिल आरती श्री.संजय मधुकर धुमक
रात्रौ श्री पुढिल जागरण राष्ट्रीय सेवा मंडळ
बुधवार दि.26 सप्टेंबर 2012
बुधवार दि.26.9.2012 रोजी सकाळी श्री पुढिल आरती श्री.संजय विजय गाडेकर
रात्रौ श्री पुढिल आरती श्री.रुपेश मनोहर पवार
रात्रौ श्री पुढिल जागरण व्यवस्था लालबाग स्पोर्टस् क्लब याची होती.
गुरुवार दि.27 सप्टेंबर 2012
गुरुवार दि.27.9.2012 रोजी सकाळी श्री पुढिल आरती श्री.गणेश शांताराम माने
रात्रौ श्री पुढिल आरती श्री.राजेंद्र वामन लांजवळ
रात्रौ श्री पुढिल जागरण व्यवस्था नवजवान सेवा मंडळ
शुक्रवार दि.28 सप्टेंबर 2012
शुक्रवार दि.28.9.2012 रोजी सकाळी श्री पुढिल आरती श्री.रामचंद्र सर्जेराव बदक
रात्रौ श्री पुढिल आरती श्री. केशव शंकर गुरव
रात्रौ श्री पुढिल जागरण लालबाग मार्केट गोविंदा पथक
शनिवार दि.29 सप्टेंबर 2012
शनिवार दि.29.9.12 रोजी लालबागच्या राजाची भव्य विर्सजन मिरवणूक लालबाग गणेश नगर येथून गिरगाव चौपाटीकडे निघेल.
जाहिर लिलाव
लालबागच्या राजाच्या चरणी नवसरुपाने आलेल्या वस्तूचा जाहिर लिलाव शुक्रवार दि.5.10.2012 ते रविवार दि.7.10.2012 रोजी सायंकाळी ठिक 5.30 ते 9.30 वाजेपर्यंत गणरायाच्या स्टेजवर होणार असून भाविकांनी याची नोंद घ्यावी.
गणेशोत्सव 2012 साठी व्यवस्था
यावर्षी लालबागच्या राजाला नवस करण्यासाठी वा फेडण्यासाठी आलेल्या भाविकांची नवसाची रांग ग.द.आंबेकर मार्गावरील ओमशांती डेव्हलपर्सच्या आवारातून लागेल. या ठिकाणी पोहोचण्यासाठी भाविकांनी करीरोड - भारतमाता सिनेमा - साईबाबा पथ - ग.द.आंबेकर - अभ्युदय नगर या मार्गाचा वापर करावा. रेल्वे मार्गाने येणाऱयांनी मध्य रेल्वेचे करीरोड स्थानक वा पश्चिम रेल्वेचे लोअर परेल स्थानक अथवा हार्बर मार्गाचे कॉटनग्रीन स्थानक येथे उतरावे.
लालबागच्या राजाचे मुख दर्शन घेऊ इच्छिणाऱया भाविकांची `मुख दर्शन रांग' गणेशोत्सव 2011 सारखीच असेल. ही रांग दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी येथून चालू होऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण (गरमखाडा) मार्गे श्रीं च्या आवारात येईल. मुख दर्शन घेऊन इच्छिणाऱया भाविकांनी मध्य रेल्वे मार्गाचे चिंचपोकळी स्थानक अथवा हार्बर रेल्वे मार्गाचे कॉटनग्रीन स्थानक येथे उतरावे.