lalbaugcharaja2013
इतर सण

जन्माष्टमी

भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस संपूर्ण भारतात जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून बहुतेक ठिकाणी दहिहंडी उत्सव साजरा केला जातो.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे जन्माष्टमी निमित्त मंडळाच्या हनुमान मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव दहिहंडी फोडून साजरा केला जातो.


नवरात्रौत्सव

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे नवरात्रोत्सव देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अश्विन शुध्द प्रतिपदेला मंडळाच्या हनुमान मंदिरामध्ये सनई चौघड्याच्या घोषात श्री अंबे मातेच्या घटाची स्थापना केली जाते. या दरम्यान परंपरेप्रमाणे देवीच्या हाराचा लिलाव केला जातो. त्यामध्ये विभागीय भाविक सहभाग घेतात. अष्टमीच्या दिवशी देवीसमोर होमहवनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. तसेच देवीचा गोंधळ घालून सामुदायिक प्रार्थना केली जाते. उत्सवा दरम्यान महिला भजनी मंडळांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे विभागीय मुला-मुलींकरिता विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते.


हनुमान पालखी मिरवणूक सोहळा

प्रथेप्रमाणे दरवर्षी 1 मे या दिवशी मंडळातर्फे हनुमान पालखी मिरवणूक लेझीम, ढोल ताशांच्या जल्लोषात काढण्यात येते. याप्रसंगी ऐतिहासिक प्रसंगावर आधारित देखावा देखील सादर करण्यात येतो.

या व्यतिरिक्त मंडळाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात येते.

हरिनाम किर्तन सप्ताह

मंडळातर्फे रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान हरिनाम किर्तन सप्ताह आयोजित करण्यात येतो. त्याचा लाभ शेकडो भाविक घेतात.Mobile app
अ‍ॅनड्रॉईड अ‍ॅप

install
Daily Aarti of the Utsav 2013
Live दर्शन
Facebook
फेसबुक
lalbaugcharaja2013
Copyrights © 2013 Lalbaugcha Raja Saravajanik Ganeshotsav Mandal. All rights reserved.