गणेश मुहूर्त पूजन2008
गणरायाची
मूर्ती
बनवायला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी मुहूर्त पूजन करण्यात येते. यावेळी गणरायाचे चरण बनवून पाद्यपूजा करण्यात येते. हे मुहूर्त पूजन गणेशोत्सवापूर्वी अडीच ते तीन महिने अगोदर करण्यात येते. गणेश पूजनापासून मंडळाच्या धार्मिक व इतर कार्यांचीसुध्दा सुरुवात करण्याचा प्रघात आहे.
यंदाच्या `अमृत महोत्सवाची' सुरुवात मंगळवार दि.17.6.2008 रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री.सुनिल दत्ताराम जोशी यांच्या हस्ते सायंकाळी 5.00 वाजता `गणेश मुहूर्त पूजनाने' झाली. या प्रसंगी मंडळाच्या कार्यकर्त्यां समवेत असंख्य भाविक उपस्थित होते.
.
|