मंडळाचे उपक्रम

लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र-
सन 2006 मंडळाने सर्वांसा‏ठी खुले असे `लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र' अल्प दरात सुरु केले. सदर प्रशिक्षण केंद्रात ऑफिस ऑटोमेशन, डि.टी.पी., टॅली, ऑटोकॅड, इ. अभ्यासक्रम शिकवले जातात.
या संगणक केंद्रात सरकारमान्य MS-CIT अभ्यासक्रमाचे वर्ग सुरु आहेत. 

रुग्ण सहाय्य योजना-
सध्याच्या या महागाईच्या परिस्थितीत रुग्णांना विविध स्वरुपांच्या गंभीर आजारांवर उपचार करणे क‏ठण झाले आहे. के.ई.एम.रुग्णालय, नायर रुग्णालय, लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण (सायन) रुग्णालय, जी.टी.बी.रुग्णालय, गोकुलदास तेजपाल रुग्णालय, जे.जे.रुग्णालय, कामा आल्बलेस रुग्णालय, टाटा रुग्णालय, वाडिया रुग्णालय या महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना मंडळ अर्थ सहाय्य करते. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले नागरिक या रुग्ण सहाय्य योजनेचा लाभ घेतात. दरवर्षी मंडळ हजारो रुग्णांना मदत करीत असते. यासा‏‏‏‏‏ठी प्रतिवर्षी मंडळ रुपये 50 लाखाहून अधिक रकमेचा निधी मदत म्हणून खर्च करते. 

महिलांसाठी मोफत योग प्रशिक्षण केंद्र-
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितले की स्त्री शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते या वाक्याप्रमाणेच आरोग्य उत्तम राखण्यासाठी मंडळाने महिलांचे योग प्रशिक्षण केंद्र सुरु केले असून या योग केंद्रात आतापर्यंत 250 महिलांनी योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला. 

मोफत अभ्यासिका-
कुटुंबातील माणसांची गर्दी लहानशी जागा या गोष्टी लक्षात घेऊन मध्यमवर्गीय गिरणगावांतील विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी मंडळाने मोफत अभ्यासिका चालू केली. 1500 विद्यार्थी-विद्यार्थीनींनी या अभ्यासिकेत नोंदणी केली आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकर मोफत ग्रंथालय व संदर्भ पुस्तक पेढी-
मंडळातर्फे मुंबईतील नागरिकांसा‏ठी मोफत ग्रंथालय सुरु करण्यात आले. यात कथा-कादंबरी, ललित, चरित्र-आत्मचरित्र, नाट्य-कविता, ऐतिहासिक, राजकीय, आरोग्य, विज्ञान आणि बालवाङमय अंतर्गत अनेक नामवंत लेखकांची दर्जेदार साहित्यकृती वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यासोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता संदर्भ पुस्तक पेढी सुरु करण्यात आली असून पुस्तक पेढीत इ.10वी पासून इ.15वी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसा‏ठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, तसेच युपीएससी/एमपीएससी (UPSC/MPSC), बँकिंग स्पर्धा परीक्षा त्याचप्रमाणे इंजिनियरींग, फार्मास्युटीकल, मेडिकल, कायदे विषयक शाखांतील मान्यवर लेखकांची व विविध नामवंत प्रकाशन संस्थांची संदर्भ पुस्तके मोफत उपलब्ध आहेत. 

पुरग्रस्तांस 25 लाख रु. ची मदत-
26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईसह कोकण विभागाला महापुराचा जोरदार तडाखा बसला. अनेक ‏‏ठकाणी व गावात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये शेकडो लोक मृत्यू पावले. हजारो लोक बेघर झाले. मो‏ठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. मंडळातर्फे सदर पुरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून 25 लाख रु. मंजूर करण्यात आले. मंडळाच्या 100 कार्यकर्त्यांचे पथक 8 दिवस महाड पोलादपूर तालुक्यात गेले होते. सोबत 7 डॉक्टरांचे पथकही होते. या आपद्ग्रस्त व दरडग्रस्तांना अन्नधान्य, कपडेलत्ते, भांडीकुंडी व वैद्यकीय मदत पुरविण्यात आली. कोंडीवते गावातील एकाच कुटुंबातील 22 माणसे दरड कोसळून ढिगाऱयाखाली गाडली गेली. त्यातील फक्त एकच महिला जीवंत राहीली. तिचे नाव श्रीमती सविता सकपाळ. तिला सरकारकडून मदत मिळेपर्यंत मंडळाने दरमहा रु. 1000/- ची मदत पा‏‏ठविली व तिला जीवनावश्यक वस्तुंची मदत केली.
पोलादपूर तालुक्यातील कोंडवी गावातील गँगरीन झालेल्या एका महिलेच्या पायावर शस्त्रक्रिया करुन तिला मरणाच्या दारातून बाहेर काढले.
मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी बदलापूर, कुर्ला (कामगार नगर) येथील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तु इत्यादींचे वाटप केले.
दिवा येथील आपद्ग्रस्तांना देखील अन्नधान्य, कपडे, चटया, भांडी इत्यादींचे वाटप केले.
पनवेल व गोरेगांव येथे मो‏ठ्या प्रमाणात वैद्यकीय शिबीर आयोजित करुन लोकांना टि.टी. इंजेक्शनस टोचण्यात आली व अँटीबायोटिक्स, टॉनिक्स इत्यादींचे वाटप करण्यात आले.
पनवेल येथील `शांतीवन' या कुष्‏ठरोग्यांच्या आश्रमात रु. 2 लाख किमतीची औषधे मंडळाकडून मदत म्हणून देण्यात आली.


लालबागच्या राजाचा महाविद्यालय उभारणीस हातभार
26 जुलै 2005 रोजी आलेल्या भयंकर महापुरामध्ये रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील शिवाई शिक्षण संस्थेचे महाविद्यालय संपूर्णपणे वाहून गेले होते.मंडळाने रु.3 लाख खर्च करून दोन वर्ग बांधून दिले व शिवाई संस्थेच्या महाविद्यालय उभारणीस खारीचा वाटा उचलला.


जुई गाव पुनर्वसन प्रकल्प

26जुलै 2005रोजी आलेल्या प्रलयंकारी महापुरामध्ये रायगड जिह्यातील महाड तालुक्याच्या जुई गावात प्रचंड दरड कोसळून त्या दरडीखाली अनेक घरे गाडली गेली. त्यामध्ये मो‏ठया प्रमाणात जीवीत व वित्तहानी झाली. एकुण 66 घरातील लोक बेघर झाले. या लोकांचे पुनर्वसन करण्याचा शब्द मंडळाने जुईकरांना दिला होता. त्यापैकी 30घरांचे पुनर्वसन करण्याची संधी मंडळाला प्राप्त झाली. प्रत्येकी 400चौरस फुटांचे एक घर याप्रमाणे मंडळाने रु.50लाख खर्च करुन 30 घरे दरडग्रस्तांना बांधून दिली. मंडळाने जुईकरांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. 
सदर दरडग्रस्तांना या घरकुलांचे चाव्या वाटप गुरुवार दि.26 एप्रिल 2007 रोजी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री.विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते जुई गावात करण्यात आले. तत्प्रसंगी रायगड जिह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे, महाडचे आमदार माणिकराव जगताप, लालबागचे स्थानिक आमदार दगडूदादा सकपाळ, महाडचे जिल्हाधिकारी कांबळे साहेब, प्रांताधिकारी डॉ.शिवाजी पाटील, महाड व जुई गावाचे ग्रामस्थ व लोक प्रतिनिधी तसेच शासनाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

mHeOee& परीक्षा मार्गदर्शन
`परीक्षा' म्हणजे ज्ञानाचे मोजमाप करण्याचे साधन तर `स्पर्धा परीक्षा' म्हणजे आयुष्याच्या जडणघडणीचा पाया...! विद्यार्थ्यांचा हा पाया मजबूत करून त्यांच्या ज्ञानाची पातळी उच्चस्तरावर नेऊन या परीक्षांमध्ये नेत्रदिपक यश प्राप्त करुन देण्यासाठी मंडळाचा हा ध्यास.
आजच्या स्पर्धेच्या युगात, शिक्षणाशिवाय नव्हे `उच्च शिक्षणा'शिवाय तरणोपाय नाही हे सर्वमान्य आहेच व म्हणून यशस्वी होण्यासा‏ठी बदलत्या काळाचा मार्ग स्विकारणे हे गरजेचेच आहे. 
सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्वे घडावावीत, समाजातील तळागाळातील स्तरांमधून भारतीय प्रशासकीय सेवेत वा राज्य प्रशासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकारी निर्माण करावेत हा मंडळाने हाती घेतलेला एक महत्वाकांक्षी संकल्प ! या संकल्पपूर्तीतून घडलेल्या विद्यार्थ्यांच्या बुध्दिमत्तेतून देशाच्या प्रगतीचे राजमार्ग निर्माण व्हावेत म्हणूनच मंडळाचा `स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र' चालविण्याचा प्रामाणिक प्रयत्न. 

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS/IPS) परीक्षा प्रशिक्षण शिबीर
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात येणाऱया भारतीय प्रशासकीय सेवेतील विविध पदांच्या परीक्षेचे स्वरूप आपल्या सभोवतालच्या पदवीधर विद्यार्थ्यांना कळावे त्याचप्रमाणे सदर परीक्षांच्या अभ्यासाचे नेमके स्वरूप त्यांना समजावे व त्यात यशस्वी होण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळावी म्हणून उत्सव मंडळाने मंगळवार दि.27 मार्च 2007 रोजी हनुमान मंगल कार्यालय, लालबाग, मुंबई-12 येथे `घ्Aए/घ्झ्ए प्रशिक्षण शिबीर' आयोजित केले होते. 
सकाळी 9 वा. सुरू झालेल्या सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष श्री.सुनिल दत्ताराम जोशी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन झाले. सकाळी 9 ते 12 या सत्रात सेंट्रल एक्साईज आणि कस्टम्सच्या उपायुक्त सौ.सुप्रिया देवस्थळी-कोलते यांनी `UPSC परीक्षेची पूर्वतयारी व मुलाखत तंत्र'या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना अत्यंत अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. तसेच विदर्भ स्टडी सर्कलचे संचालक प्रा.प्रविण निनावे यांनी UPSC परीक्षेतील अनिवार्य विषय तसेच सामान्य अध्ययन या विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. 
याच प्रशिक्षण शिबिराच्या दुपारी 2 ते 5 च्या सत्रात भारतीय प्रशासकीय सेवेतील विविध खात्यांतर्गत कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष घ्Aए व घ्झ्एअधिकाऱयांच्या उपस्थित `िशवधनुष्य पेलताना..!' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. सदर चर्चासत्रात श्री.जयराज फाटक IAS (मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा संचालनालय), श्री.अविनाश धर्माधिकारी IAS (माजी सनदी अधिकारी), सौ.मनिषा पाटणकर-म्हैसकर IAS (महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र राज्य), सौ.प्रज्ञा सरवदे IPS (अतिरिक्त आयुक्त, अँटिकरप्शन ब्युरो) हे सन्माननीय व्यक्तिमत्वे सहभागी झाली होती आणि समाजाच्या उत्कर्षासा‏ठी त्यांनी केलेल्या अहोरात्र परिश्रमाचे पैलू आपल्या खुसखुशीत निवेदन शैलीतून उलगडून दाखविण्याचे काम महाराष्ट्राचे सुप्रसिध्द निवेदक श्री.सुधीर गाडगीळ यांनी केले. 
सायंकाळी 6 ते 8 च्या सत्रात प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी पोलीस सह आयुक्त श्री.हेमंत नगराळे त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त (परि.2) श्री.प्रताप दिघावकर, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय ओक, स्थानिक आमदार श्री.दगडूदादा सकपाळ हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवर वक्त्यांनी अनुभवाच्या शिदोरीतून जीवनात आपल्याला कसे यशस्वी होता येते याची प्रचिती विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून करून दिली. 

राज्य सेवा पूर्व परीक्षा (MPSC) मार्गदर्शन शिबिर (झेप 2007)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱया तहसिलदार, उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, कक्ष अधिकारी तसेच पोलिस उपअधिक्षक या पदांसाठीच्या पूर्व परीक्षेत विद्यार्थ्यांना सहज यशस्वी होता यावे यासाठी मंडळाने दि.8 जुलै 2007 रोजी `राज्य सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन शिबिर' आयोजित केले होते. सदर शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव श्री.अजित निंबाळकर IAS यांनी करून आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱयांच्या कर्तव्यनिष्ठ भूमिकेचे विश्लेषण उपस्थित विद्यार्थ्यांना सांगून मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात शिबिरात सौ.सुप्रिया देवस्थळी-कोलते (उपायुक्त, सेंट्रल एक्साईज आणि कस्टम्स) व चाणक्य मंडळाचे प्रशिक्षक श्री.अमोल कडू यांनीदेखील विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने यथोचित मार्गदर्शन केले. पोलिस उप आयुक्त श्री.दत्तात्रय कराळे यांनी या मार्गदर्शन शिबिराच्या समारोपीय भाषणात आपल्या पोलीस कारकीर्दितील यशाचे गमक विद्यार्थ्यांना सांगितले. 

राज्य सेवा पूर्व परीक्षा (MPSC) मोफत प्रशिक्षण वर्ग (झेप 2007)-
केंद्रिय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱया विविध पदांच्या परीक्षेच्या मार्गदर्शनपर शिबिरास लाभलेल्या विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादानंतर मंडळाने जे विद्यार्थी सप्टेंबर2007 मध्ये होणाऱया राज्य सेवा पूर्व परीक्षेला बसले आहेत त्यांच्यासाठी दि.18 जुलै 2007 ते दि.17 ऑगस्ट 2007 या 30 दिवसांच्या कालावधीत मोफत प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. या प्रशिक्षण वर्गांचा लाभ सुमारे 150 विद्यार्थ्यांनी घेतला. सदर मोफत प्रशिक्षण वर्गात सौ.सुप्रिया देवस्थळी-कोलते(उपायुक्त-सेंट्रल एक्साईज आणि कस्टम्स), कु.जयश्री धायगुडे, कु.मंजिरी जाधव, श्री.राजेंद्र मरकड, श्री.सुजित पवार व श्री.भरत मते या तज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना रोज होणाऱया प्रशिक्षण वर्गात राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 
मार्गदर्शन वर्गांचा समारोप सोहळा दि.17 ऑगस्ट 2007 रोजी डॉ.शिरोडकर सभागृह येथे माजी सनदी अधिकारी श्री.अविनाश धर्माधिकारी IAS यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


Copyrights © 2007 LALBAUGCHA RAJA SARVAJANIK GANESHOTSAV MANDAL - Honourable Member : Bharat Bhujbal