लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली तीच मुळी नवसाने! सध्या अस्तित्त्वात असलेली मंडई निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारीबंधुंनी नवस केला होता.

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरीता जनजागृती व्हावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ‏ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. सन 1934 ते 1947 या स्वातंत्र्यपूर्व काळात विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली जात असत. अखिल भारतीय पुढारी शंकरराव देव, कामगार नेते भाई डांगे, एस्.एम.मिरजकर, भाई जगताप, हिंदुत्व निष्‏ठ अनंतराव गद्रे, मुंबई काँग्रेसचे पुढारी एस.के. पाटील, गो.बा. महाशब्दे, भुलाभाई देसाई अशी राष्ट्रीय विचारसरणीची मंडळी येथे व्याख्याने देऊन जनजागृती करीत असत


 
लालबागच्या राजाची स्थापना - 1934
     
इतर उत्सव
     
देणगी
 
 
लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली तीच मुळी नवसाने! सध्या अस्तित्त्वात असलेली मंडई निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारीबंधुंनी नवस केला होता. तत्पूर्वी पेरुचाळ येथे उघड्या जागेवर बाजार भरत असे तो 1932 साली बंद करण्यात आला,
मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवा बरोबर वर्षभर वेगवेगळे सण साजरे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने नवरात्रौत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, हरिनाम कीर्तन सप्ताह, हनुमान पालखी मिरवणूक, जन्माष्टमी, इत्यादींचा समावेश होतो.….

मंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्यासाठी लालबागच्या राजाच्या भक्तांकडून मिळणाऱया देणगीचा वापर केला जातो. या उपक्रमांमध्ये अनेक शैक्षणिक, वैद्यकीय तसेच सामाजिक कार्यांचा समावेश होतो......
 




 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
Copyrights © 2007 LALBAUGCHA RAJA SARVAJANIK GANESHOTSAV MANDAL - Honourable Member : Bharat Bhujbal