वेबसाईट विषयी

मी, भरत काशिनाथ भुजबळ, झेरॉक्स मशिन दुरुस्ती व्यवसायात असून माझा कॉम्प्युटर डि.टी.पी. व वेबसाईट निर्मिताचा ही व्यवसाय आहे. मी श्री गणराया लालबागच्या राजाचा भक्त असून त्यावर माझी नितांत श्रध्दा आहे. ही श्रध्दा व्यक्त करण्यासाटी तसेच लालबागच्या राजाचा महिमा व मंडळाचे कार्य सर्व जगास कळण्यासाठी लालबागच्या राजाची वेबसाईट निर्माण करण्याचा विचार माझ्या मनात आला. मी ताबडतोब मंडळाच्या पदाधिकाऱयांकडे गेलो व त्यांच्यासमोर हा विचार मांडला. त्यांनीही या कल्पेनेचे स्वागत करुन मला संमती दिली. तसेच ही वेबसाईट पूर्ण करण्यासाठी मला हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

मंडळाकडून संमती मिळाल्याबरोबर मी वेबसाईट पूर्ण करण्याच्या कामाला लागलो. या कामी माझी पत्नी सौ.उज्वला भरत भुजबळ आणि श्री. मनोज तिन्ऩा, दिवॆश कुडवऴकर यांनी मला दिवस-रात्र मदत केली. तसेच, श्री.राजेश ठाकूर व त्यांचे ``ट्राकॉम नेटवर्कस् लि., चेंबूर'' येथील सहकारी यांनी वेबसाईट बनविण्यासाठी मला उपयुक्त सल्ले दिले. मंडळाच्या स्थापनेपासूनची माहिती व छायाचित्रे जमविण्यासाटी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री.अशोक मारुती पवार व श्री.संजय विजय गाडेकर यांनी मदत केली. ही वेबसाईट बनविण्यासाठी मंडळाचे सल्लागार श्री.निवृत्ती भुजबळ व श्री.शंकर भुजबळ तसेच श्री.आर.एच.अन्सारी, श्रीमती राधा तेली, श्री.अनंत घोगले (पत्रकार), श्री.प्रशांत केळसकर (साई ऑफसेट प्रिंटर्स) यांचेही मला मोलाचे सहकार्य लाभले. 
‘www.lalbaugcharaja.com’ या वेबसाईटचे उद्घाटन लोकप्रिय स्थानिक आमदार श्री.दगडू (दादा)सकपाळ यांच्या शुभहस्ते 22 ऑगस्ट 2000 या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर झाले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार व सन्माननीय सभासद, विविध वाहिन्यांचे वृत्त व छायाचित्रकार तसेच अनेक गणेशभक्त उपस्थित होते. 

या वेबसाईटद्वारे श्री गणेशा विषयी व हिंदू संस्कृतीचे माहिती सर्व जगाला कळावी अशी माझी आशा आहे. तसेच या वेबसाईटद्वारे जगातील अनेक गणेशभक्तांना ``लालबागचा राजा''च्या दर्शनाची व उपासनेची संधी मिळेल.
याद्वारे माझे ``लालबागचा राजा''ची वेबसाईट बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 

आपल्या प्रतिक्रिया कळविण्यासाठी व अधिक माहितीसाठी:
श्री.भरत काशिनाथ भुजबळ
606, एफ विंग, लालबागचा राजा गृह निर्माण संस्था, श्री गणेश नगर, लालबाग, मुंबई-400 012. 
ई मेल- bharat@lalbaugcharaja.com
दूरध्वनी:- 91-99670 30303 / 91-98214 74942
श्री.मनोज तिन्ऩा 
38/1085, नेहरु नगर, कुर्ला (पूर्व), मुंबई-400 024.
ई मेल- m_tinna@hotmail.com
दूरध्वनी:- 91-98214 90521