Video Camera

छायाचित्र संग्रह

गणेशोत्सव 2011

राजाचा फोटो

विसर्जन 2010

वॉलपेपर

Video Camera

उत्सव २०११ - दररोजची आरती

Lalbaugcha Raja Aarti

10 सप्टेंबर 2011,
संध्याकाळची आरती

Lalbaugcha Raja Aarti

10 सप्टेंबर 2011,
सकाळची आरती

Lalbaugcha Raja Aarti

9 सप्टेंबर 2011,
संध्याकाळची आरती

क्लिक करा

लालबागच्या राजाची दररोजची आरती पाहण्यासाठी कृपया येथे

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित

मोफत I.A.S./ I.P.S. परीक्षा प्रशिक्षण शिबीर

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ

लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार सन 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाउढसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे 1934 साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात `श्री'ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्री ची मूर्ती प्रसिध्द झाली.

असे असले तरी तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्ती-करीता जनजागृती व्हावी याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. सन 1934 ते 1947 या स्वातंत्र्यपूर्व काळात विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली जात असत. अखिल भारतीय पुढारी शंकरराव देव, कामगार नेते भाई डांगे, एस.एम.मिरजकर, भाई जगताप, हिंदुत्वनिष्ठ अनंतराव गद्रे, मुंबई काँग्रेसचे पुढारी एस. के. पाटील, गो. बा. महाशब्दे, भुलाभाई देसाई अशी राष्ट्रीय विचारसरणीची मंडळी येथे व्याख्याने देऊन जनजागृती करीत असत. सन 1942 हे साल महात्मा गांधीच्या चलेजाव चळवळीचे होते. या चळवळीत मंडळाचे कार्यकर्ते कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ.व्ही.बी.कोरगावकर, हाटले इ.नेत्यांची धरपकड करण्यात आली.

त्याकाळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. सन 1946 साली `श्री' ची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखविण्यात आली. सन 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. त्यावर्षी मंडळाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात `श्री' ची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. 1948 साली महात्मा गांधी स्वर्गवासी झाले. तेव्हा गांधींजींची प्रतिकृती गजाननाच्या स्वरुपात दाखविण्यात आली.

www.lalbaugcharaja.com आता www.lalbaugcharaja.in या स्वरुपात उपलब्ध आहे.