Home

 

 

सर्वांचे आभार!

दि. २९ आॅगस्ट २०१७ रोजी मुंबई शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक चाकरमाने, नागरिक आणि भाविक यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अनेक कार्यकर्ते, भाविक आणि नागरिक यांनी पुढे येऊन पावसामुळे अडकलेल्या लोकांना मदत केली. मंडळातर्फे चहा, नाश्ता आणि राहण्याची सोय करण्यात आली होती. अनेकांनी यात प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सर्व विसरून मदत केली.

लालबागचा राजा’च्या फेसबुक, ट्विटरवर आपल्या शुभेच्छा, आशीर्वादाचा अक्षरशः पाऊस पडला. आपल्याला पावसामुळे झालेल्या अडचणी प्रत्यक्षपणे आणि सोशल माध्यमांवर सोडवायचा प्रयत्न मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून केला. या सर्वांसाठी लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वांचे मनापासून आभारी आहे. सर्व नागरिक, भाविक, मुंबई पोलीस, प्रशासन, अधिकारी वर्ग, नेते, ज्यांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष कालच्या संकटाच्या वेळी मदत केली त्या सर्वांचे मंडळ मनापासून आभारी आहे.

अधिकृत माहितीसाठी आमच्या ऑफिसिअल फेसबुक आणि ट्विटर अकॉऊंटला भेट देत राहा.

-लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई

<!–:–>